सोलापूरजवळ मालगाडीचे डबे घसरले, दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम

दुधनी (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) नजीक रेल्वे रूळांना तडे गेल्याने मालगाडीच्या इंजिनसहित ५ वॅगन घसरले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास घडली आहे.

वाडी जंक्शनवरून होटगी स्थानकाकडे सिमेंटसाठीचा कच्चा माल या मालगाडीत आणण्यात येत होता. रात्री १२.३० च्या सुमारास दुधनी रेल्वे स्थानकाजवळ रूळाला तडे गेल्याने या मालगाडीचे इंजिन आणि ५ डबे घसरले. या अपघातामुळे दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आले आहेत. तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असल्याची माहिती उप रेल्वे प्रबंधक राजेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *