बिबट्या सिमेंट पाइपमध्ये घुसला आणि फसला

गावात जवळ शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या  सिमेंटचा पाइपमध्ये फसल्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी गावकरी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कसरत पाहायला मिळाली. मात्र, बाहेर पडल्यानंतर बिबट्याला ग्रामस्थांनी लाठ्यांनी मारहाण केली.

वन अधिकाऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या समवेत गावकऱ्यांनी बिबट्यावर हल्ला चढवला. यात बिबट्या जखमी झाला. लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोठा येथे ही घटना घडली.  दरम्यान, बिबट्याला मारहाण करताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *