वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा सचिनच्या नावानं दुमदुमला…

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा सोमवारीवाढदिवस  होता… त्याच्या चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा मिळणं हे तर साहजिकच होतं… परंतु, त्या शुभेच्छा अशाही दिल्या जातील, याची कदाचित सचिनला कल्पना नसेल…

हजारो चाहत्यांनी वानखेडे स्टेडियमवरच सचिनला ‘हॅपी बर्थडे’ गात शुभेच्छा दिल्या. असं काही होईल याची कल्पनाही नसलेला सचिन कॅमेरा चेहऱ्यासमोर आल्यानंतर चक्क लाजला…

वानखेडे स्टेडियमवर वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर सचिननं आपण 44 वर्षांचे झालोय यावर विश्वास बसत नसल्याचं म्हटलंय. सचिननं मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजाईंट सामन्याच्या वेळी केकही कापला. तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सचा मेन्टार म्हणून काम पाहतोय. 2008 ते 2013 पर्यंत तो याच फ्रेंचायजीकडून खेळत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *