जन्मदात्याकडून मुलीवर अत्याचार, आईचाही मदतीसाठी नकार

मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत ४० वर्षांचा जन्मदाता गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना कफ परेडमध्ये उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे याबाबत मुलीने आईकडे मदतीची मागणी केली. मात्र, आईनेही बदनामीच्या भीतीने मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. या प्रकरणी कफपरेड पोलिसांनी वडिलांविरुद्ध पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन नराधम बापाला बेड्या ठोकला.

कफ परेड परिसरात १६ वर्षांची नेहा (नावात बदल) आईवडिलांसह राहते. आई कामासाठी बाहेर गेल्यावर ती वडिलांसोबत असायची. याच संधीचा फायदा घेत २०१२ मध्ये पहिल्यांदा ११ वर्षांच्या नेहावर बापाने लैंगिक अत्याचार केले. कुणाकडे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो अत्याचर करत राहिला. मंगळवारी संध्याकाळी त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. आईने तुझा गैरसमज होत असल्याचे सांगून तिला पुन्हा गप्प केले. अखेर कंटाळलेल्या नेहाने एकटीनेच पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *