कारचालकांना दिलासा

कारचालकांना दिलासा

महागाईची झळ सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोलचे दर प्रति लीटर 31 पैसे तर डिझेल प्रति लीटर 71 पैशांनी स्वस्त झालं आहे.

पंधराच दिवसांपूर्वी पेट्रोलच्या दरात 64 पैशांनी वाढ झाली होती. मात्र पुन्हा दर 31 पैशांनी घटल्यामुळे कारमालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. डिझेलचे दर 15 दिवसांपूर्वी 1 रुपया 35 पैशांनी कमी झाले होते.

सरकारने मागील ऑक्टोबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलला नियंत्रणमुक्त केलं होतं. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *