मुंढे सर एक पाऊल मागे, जेवणाच्या सुटीत कर्मचाऱ्यांना बाहेर जाता येणार

पीएमपीएलच्या अध्यक्षपदाची  सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ वाढविण्याचा आदेश दिला होता. तर त्यानंतर त्यानी कर्मचाऱ्यांना चहा नाष्टा या इतर कामासाठी बाहेर जाता येणार नाही, असा निर्णय घेतला होता. या निर्णयावर कामगार वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुंढे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज कर्मचायांना जेवणाच्या सुटीत बाहेर जात येणार आहे. अशा प्रकारची सूट दिली.

तर त्याचबरोबर कर्मचाऱ्याला बाहेर जाण्याची आवश्यकता असल्यास त्याला फक्त जेवणाच्या सुटीत बाहेर सोडावे. जो कर्मचारी बाहेर जाणार आहे. त्याने आपल्या विभागातील सद्याची परिस्थिती रजिस्टरमध्ये आणि वॉचमन गेटवर नोंद करावी. ही सोय फक्त जेवणाच्या सुटीसाठी असून यावेळेव्यतिरिक्त कोणत्याही कर्मचाऱ्याने बाहेर पडू नये, अशा प्रकारचे आदेश देण्यात आले आहे.तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएल चा कारभार हाती घेतल्यावर अनेक महत्त्व पूर्ण निर्णय घेतले.

त्यातील कामगारांना चहा नाष्टा करिता बाहेर जाता येणार नाही असा थेट आदेश काढल्याने कामगार संघटनाच्या रोषाला सामोरे जावे लागले.शहरात एकूण १३ डेपो असून यातील बहुतांश ठिकाणी कॅन्टीनची सुविधा नाही. तर ज्या ठिकाणी कॅन्टीन आहेत. तेथे पुरेशी यंत्रणा नाही. यामुळे कामगारांना बाहेर चहा नाष्टया करिता बाहेर जावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली. यावर तातडीने मुंढे यांनी एक पाऊल मागे येत कर्मचाऱ्यांना जेवणाच्या सुटीत बाहेर जात येणार असल्याचा आदेश जाहिर केला. यामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *