हँडसम नसल्यामुळे नवविवाहितेकडून पतीचा खून

नवरा दिसायला हँडसम नसल्यामुळे पत्नीनं त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार तामीळनाडूच्या कडलोरमध्ये घडला आहे.  २२ वर्षांची या महिलेचं मागच्याच आठवड्यात लग्न झालं होतं. पण दोघांमध्येही वाद झाल्यानं पत्नीनं पतीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.

हा मुलगा हँडसम नाही आणि तुझ्यासाठी योग्य नसल्याचं मुलीचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडून हिणवण्यात आल्यानं महिलेनं हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

या घटनेनंतर महिलेनं बाहेर येऊन पतीचा कोणीतरी खून केल्याचा कांगावा केला पण पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर तिचं बिंग फुटलं. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. कोर्टमध्ये सादर केल्यानंतर आता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *