सुपरस्टार कमल हसन यांच्या घराला आग

तामिळ सुपरस्टार कमल हसन यांच्या घराला शनिवार पहाटे आगीनं घेरलं.

या दुर्घटनेत कमल हसन थोडक्यात वाचले… आपण सुखरुप आहोत, असा संदेश त्यांनी आपल्या चाहत्यांना ट्विटरवरून दिलाय.

‘माझ्या स्टाफचे आभार… घरात लागलेल्या आगीपासून वाचलो… फुफ्फुस सगळं धुरानं भरलंय… तिसऱ्या मजल्यावरून खाली उतरलो. मी सुरक्षित आहे, कोणतीही वाताहत नाही’

घरात आग कोणत्या कारणानं लागली, हे मात्र कमल हसन यांनी सांगितलेलं नाही. परंतु, नक्कीच ते सुरक्षित असल्यानं त्यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *