64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आहे. कासव या मराठी सिनेमाला सुवर्णकमळाचा मान मिळाला आहे. दशक्रीया चित्रपटला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला तसेच व्हेंटिलेटरचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. व्हेंटिलेटरला चार पुरस्कार मिळाले.
या चित्रपटांना मिळाले राष्ट्रीय पुरस्कार
– सर्वोत्कृष्ट चित्रपट – कासव (सुवर्णकमळ)
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
– सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – दशक्रिया
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी ( दशक्रिया)
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम ( दंगल )
– सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – नीरजा
– सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील चित्रपट – पिंक
– सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस – शिवाय
– सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग – व्हेंटिलेटर
– साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
– सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर
– सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
– फिल्म फ्रेंडली राज्य – उत्तरप्रदेश
