मुलाचा चेहरा आपल्यावर न गेल्याने पत्नीची हत्या

मुलाचा चेहरा आपल्यावर न गेल्याच्या क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवीण असं या आरोपी पतीचं नाव आहे. मुलाचा चेहरा आपल्याशी मिळता जुळता नसल्याने प्रवीणला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळेच प्रवीणला प्रचंड राग आला होता, आणि याच रागाच्या भरात त्याने पत्नीची हत्या केली.

प्रवीणला आपली पत्नी शिल्पाचं अफेअर सुरु असल्याचा संशय होता. या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये अनेकदा मोठी भांडणंही झाली होती. बुधवारी दोघेही फिरण्यासाठी बाहेर जाणार होते. पण त्यावेळीही पुन्हा याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये भांडण सुरु झालं. संतापाच्या भरात प्रवीणने नायलॉनच्या रशीने शिल्पाचा गळा दाबून हत्या केली. यानंतर प्रवीणने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं.
प्रवीण आणि शिल्पाचं 2015 रोजी लग्न झालं होतं. 2016 मध्ये त्यांना मुलगा झाला. जन्माला आलेलं मूल आपल्यासारखं दिसत नसून त्याच्यात आणि आपल्यात काहीच साम्य नसल्याचं प्रवीणला जाणवलं. हे मूल आपलं नसावं असं वारंवार त्याला वाटत होतं. त्याने आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप करण्यास सुरुवात केली. यावरुन दोघांमध्ये भांडणं सुरु झाली होती. या भांडणातूनच अखेर प्रवीणने शिल्पाची हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *