बुलडाण्यात पित्यानेच केली मुलीची हत्या

बुलडाणातल्या मलकापुर तालुक्यामधल्या निमखेडमध्ये पित्यानेच मुलीची हत्या  केल्याची घटना समोर आली आहे.

बाळू हिवरे असं या आरोपीचं नाव आहे. तर मनिषा गजानन हिंगणे असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. बाळू हिवरे यानं कु-हाडीचे घाव घालून, मनिषा हिंगणे हिचा निर्घृण खून केला.

मनिषानं आंतरजातीय विवाह केला होता. त्याला तिच्या वडिलांचा विरोध होता. त्याचाच राग मनात ठेऊन, मनिषाच्या वडिलांनी तिची हत्या केली.

अवघ्या दहा दिवसांपूर्वीच २६ मार्चला मनिषानं तिच्याच गावातल्या गजानन हिंगणे याच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. दरम्यान मनिषा तिच्या सासरी घरात एकटी असल्याची संधी साधून, बाळू हिवरेनं घरात घुसून तिची हत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *