नातीवर बलात्कार करणा-या आजोबाच्या आवळल्या मुसक्या

  आजोबानंच स्वतःच्या नातीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील चारकोप पोलीस स्टेशनमध्ये एका अल्पवयीन मुलीनं आपल्या 56 वर्षांच्या आजोबांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. होणा-या अत्याचाराची कुठेही वाच्यता करायची नाही असे सांगत आजोबांनी जिवे मारण्याची धमकी दिली व परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. आरोपी आजोबा हा गुजरातमध्ये वॉचमॅनचं काम करतो तर पीडित मुलीचे आईवडील हे मुंबई मजुरीचं काम करत असल्याचे समजते.

दिलेल्या माहितीनुसार, 3 एप्रिल रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने आईवडील तिला घेऊन कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर पीडित मुलगी 2 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर कुटुंबीयांनी मुलीची विचारपूस केल्यानंतर तिनं आजोबांनी अत्याचार केल्याचे आरोप केले. यानंतर तिच्या आजोबांविरोधात चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली.
चारकोप पोलिसांव्यतिरिक्त क्राईम ब्रांचचं युनिट 11 देखील या प्रकरणाची तपासणी करत होते. आरोपी आजोबा गुजरातमध्ये असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली. त्याला मुंबईत बोलवण्यासाठी तपास पथकाने पीडित मुलीच्या शेजा-यांची मदत घेतली आणि आरोपी मुंबईत पोहोचताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
असा जाळ्यात अडकला आरोपी
दरम्यान, तपासणीदरम्यान सुरुवातीला पीडित मुलीनं दोन जणांनी बेशुद्ध करुन निर्वस्त्र करत तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती क्राईम ब्रांचला दिली होती. पण तिच्या बोलण्यावर पोलिसांना विश्वास बसला नाही. त्यामुळे तिच्याकडून आणखी माहिती काढून घेण्यासाठी एका आरोपीला अटक केल्याचं पोलिसांनी तिला सांगितलं. त्यावर पीडितेच्या तोंडून ‘काय, आजोबांना पकडण्यात आलं?’असे शब्द आपणहून निघाले. त्यावेळी पोलिसांना ख-या आरोपीची माहिती हाती लागली.
क्राईम ब्रांचनं दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांनी शेजा-यांना आरोपी आजोबासोबत संपर्क साधून पीडित मुलीची आई आजारी असल्याचे सांगायला सांगितले. पत्नीचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्या नातीचे वडील हॉस्पिटलमध्ये असतात, त्यामुळे मुलगी एकटीच घरात असते. तिचा सांभाळ करण्यासाठी कुणीही नाही. पोलिसांनी रचलेल्या या सापळ्यात आरोपी आजोबा अलगद सापडला. व पोलिसांनी त्याला गजाआड केलं
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *