स्टीव्ह स्मिथचे पुणेरी फटके

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. मैदानात अव्वल ठरण्यासाठी सर्व संघांनी प्रयत्न सुरु केले असून वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. सर्व संघांवरील दडपण वाढत चाललं असताना रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणा-या स्टीव्ह स्मिथने आपल्या संघातील वातावरण थोडं हलकंफुलकं करण्यासाठी एक वेगळा प्रयत्न केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ चक्क पुणेकरांच्या पारंपरिक वेषात अवतरला आहे.
आयपीएल पुणे संघाचं नेतृत्व सांभाळत असल्याने आधीच पुणेकर झालेल्या स्टीव्ह स्मिथने प्रमोशनच्या निमित्ताने संपुर्ण पुणेकर होण्याचं ठरवलं आहे. म्हणून प्रमोशनच्या निमित्ताने का होईना पण स्टीव्ह स्मिथने चक्क पुणेरी पारंपारिक वेष परिधान केला होता. इन्स्टाग्रामवर स्टीव्ह स्मिथने आपला फोटो शेअर केला असून स्मिथने बाराबंदी, धोतर, कमरेला शेला, गळ्याभोवती उपरणं आणि डोक्यावर पुणेरी पगडी असा पारंपरिक वेष परिधान केलेला दिसत आहे.
या फोटोमध्ये स्टीव्ह स्मिथसोबत भारतीय क्रिकेटर आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्समधील त्याचा सहकारी अजिंक्य रहाणेदेखील दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *