हिंगोलीजवळ बस-ट्रक धडकेत ७ ठार, ३५ जखमी

नांदेडहुन हिंगोलीकडे येत असलेली एक खाजगी बस आणि नांदेडकडे जात असलेल्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एका लहान मुलीसह ७ जण जागीच ठार झाले. या अपघातात ३४ हून अधिक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नांदेड येथील रुग्णालायत हलविण्यात आले आहे.

कळमनुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडे आठच्या सुमारास नांदेडहून हिंगोलीला येत असलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला (एमएच ३८-एफ-५७८६) समोरुन येत असलेल्या ट्रकने (एनएल-०१-क्यू- ३७५७) जोरदार धडक दिली.

पार्डी मोड पाटीजवळ ट्रकने बसला धडक दिल्यानंतर बस पलटी झाली. हिंगोली व नांदेड जिल्हातील प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश आहे. कळमनुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना प्रथम कळमनुरी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *