सनी देओलचं तोंड काळं करणाऱ्यास १० लाख

सनी देओलचं तोंड काळं करणाऱ्यास १० लाख

अभिनेता सनी देओल याचं तोंड काळं करून त्याची गाढवावरून धिंड काढण्याचं आवाहन उत्तर प्रदेशातील भाजपच्या व्यापारी सेलचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी केलं आहे. हे काम करणाऱ्यास दहा लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

सनी देओल याचा आगामी ‘मोहल्ला अस्सी’ हा वादग्रस्त सिनेमा त्यासाठी कारण ठरला आहे. ‘मोहल्ला अस्सी’ या चित्रपटात भगवान शिवशंकराचं एक पात्र दाखवण्यात आलं आहे. हे पात्र चित्रपटात चुकीच्या पद्धतीनं रंगविण्यात आलं आहे. हा भगवान शंकराचा अपमान आहे. चित्रपटात शिवीगाळीच्या भाषेचाही वापर करण्यात आला आहे. हे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा अग्रवाल यांनी दिला आहे. ‘मोहल्ला अस्सी’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर उत्तर प्रदेशात या चित्रपटाचा विरोध सुरू झाला आहे. अग्रवाल यांनी तर सनी देओलसह चित्रपट विनय तिवारी, दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर धिंड काढणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *