आऊट देण्यासाठी वर केलेला हात अंपायरनं डोक्यावर लावला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा चौथा दिवस चेतेश्वर पुजारा आणि वृद्धीमान सहानं गाजवला. या टेस्टच्या चौथ्या दिवशी चेतेश्वर पुजारानं डबल सेंच्युरी झळकावली पण अंपायरच्या एका चुकीचा फटका चेतेश्वर पुजाराला बसला असता.

 १४२ रनवर खेळत असताना अंपायर गुफी गॅफनीनं पुजाराला आऊट देण्यासाठी बोट वरती केलं पण ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच खेळाडूनं अपील केलेलं नसल्याचं लक्षात आल्यावर गॅफनी यांच्या चूक लक्षात आली आणि त्यांनी आऊट देण्यासाठी वर केलेला हात डोक्याला लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *