एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये इको फ्रेंडली होळी खेळली गेली. रंगपंचमी निमित्त एस्सेल वर्ल्डमध्ये २ दिवसाच्या इवेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेकांनी दोन दिवस एस्सेलवर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये होळी आणि रंगपंचमी साजरी केली. या वेळी मोठ्या प्रमाणात येथे लोकांनी गर्दी केली होती.
म्यूझिक, डान्स आणि मस्ती करत सगळ्यांनीच एस्सेलवर्ल्डमध्ये रंगपंचमी साजरी केली. डीजेच्या गाण्यांवर येथे तरुणाई थिरकतांना दिसली. होळी आणि रंगपंचमीच्या गाण्यांवर अनेकांनी ठेका ठरला. अगदी लहान्यांपासून ते वृद्धांपर्यंत येथे मस्ती करतांना दिसलीत.