स्वित्झर्लंडमध्ये गोळीबार, दोन ठार

येथील बसेल कॅफेत अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
स्वित्झर्लंडच्या वायव्येकडील भागात असलेल्या बसेल कॅफेत दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात कॅफेत असणा-या दोन ग्राहकांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना येथील स्थानिक वेळेनुसार रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गोळीबार करणा-या व्यक्तींचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *