जम्मू काश्मीर; पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात साताऱ्याचे जवान दीपक घाडगे हुतात्मा

जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात सातारा जिल्ह्यातील फत्यापूरचे जवान दीपक जगन्नाथ घाडगे हुतात्मा झाले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामधून देण्यात आली आहे.
दीपक घाडगे जम्मू काश्मीर भागात मराठा इन्फंट्रीमध्ये जवान म्हणून कार्यरत होते. गुरूवारी पुंछ सेक्टरमध्ये एलओसीजवळ पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. भारताकडूनही याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र यामध्ये २७ वर्षीय दीपक घाडगे यांना वीरमरण आले. जवान दीपक घाडगे यांचे प्राथमिक शिक्षण फत्यापूर येथे झालेले आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, २ मुले, बहीण असा परिवार आहे. बहीण माया घाडगे या सातारा जिल्हा पोलिस दलात सध्या कार्यरत आहेत. हुतात्मा दीपक यांचे पार्थिव आज (दि.१०) सांयकाळपर्यंत साताऱ्यात पोहोचणार आहे. शनिवारी मूळगावात अंत्यसंस्कार केले जातील असे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *