गोरेगाव जुन्या बाजारपेठेत भीषण आग

– गोरेगावमधील मधील जुन्या बाजारपेठेत आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दोन घरांसह तळमजल्यावरील फर्निचरची २ दुकाने जळून भस्मसात झाली असून २५ लाखाची वित्तहानी झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महाडसह जिल्ह्यातील 10 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तास अथक प्रयत्न करून  आगीवर नियंत्रण मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *