उल्हासनगरचं डम्पिंग ग्राउंडही पेटलं

देवनार, दिवा आणि कल्याणनंतर आता उल्हासनगरचं डम्पिंग ग्राउंडही पेटलंय. यामुळे नागरिकांना धुराचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. या त्रासाबाबत अनेकदा पालिकेकडे तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थेच असल्यानं नागरिकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

जीव गेला तरी बेहत्तर, पण डम्पिंग बंद करणारच, अशी भूमिका या नागरिकांनी घेतलीय.एकूणच या परिसरातील नागरिकांना होणारा त्रास आणि त्यावर पालिकेच्या वतीनं केलं जाणारं कामचलाऊ उपाय, यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *