पालघरहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

पश्चिम रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. पालघरहून मुंबईकडे येणारी वाहतूक अजूनही ठप्प आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबईच्या दिशेनं येणा-या मालगाडीचे सफाळे आणि वैतरणा स्थानकादरम्यान तीन डबे घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.

रात्री उशिरापर्यंत वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सुरु होतं. रात्री उशिरा मालगाडीचे डब्बे रुळावरुन हटवण्यात प्रशासनाला यश आलंय. मात्र मुंबईहून पालघरला जाणारी वाहतूक सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं असलं तरी पालघरहून मुंबईकडे येणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *