‘मोदी म्हातारे झाले, त्यांना आराम द्या’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता म्हातारे झाले आहेत, त्यांना आराम द्या आणि काँग्रेस समाजवादी पक्षाला उत्तर प्रदेशची सत्ता द्या, असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे.

उत्तर प्रदेशचं सरकार हे तरुणांचं असेल. ओबामांची पत्नी अमेरिकेत स्वयंपाकासाठी वापरणारी भांडीदेखील मेड इन जौनपूर असतील असंही राहुल गांधी म्हणाले.

मोदींच्या अच्छे दिनाचा चित्रपट फ्लॉप झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते रॅली आणि रोड शो काढून चित्रपटासाठी रिटेक घेत आहेत, असा टोला राहुल गांधींनी लगावला.

दरम्यान उत्तर प्रदेश निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. ८ तारखेला उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल शनिवारी म्हणजेच ११ मार्चला लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *