अबब! कासवाच्या पोटात ९०० नाणी

आपले नशीब फळफळावे यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. थायलँडमध्ये तर यासाठी कासवाच्या अंगावर नाणी वगैरे फेकण्याच्या प्रथा आहेत, पण हे या प्राण्यांच्या जीवावर बेतू शकते याचा विचारही लोकांच्या मनातही येत नाही. थायलँडमध्ये अशाच एका कासवाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क ९०० नाणी शस्त्रक्रिया करून बाहेर काढली आहेत.

थायलँडमधल्या पशूवैद्यकांनी सात तास शस्त्रक्रिया करून ग्रीन सी टर्टल जातीच्या कासावाच्या पोटातून तब्बल ९०० नाणी बाहेर काढली. एका कासवाच्या पोटात एवढी नाणी पाहून डॉक्टरांनी त्याचे ‘बँक’ असेच नामकरण केले. थायलँडमध्ये चांगल्या नशीबासाठी नाणी कासवाच्या पाठीवर फेकण्याची प्रथा आहे. हिच नाणी या कासवाने गिळली होती. नाण्यांच्या वजनाने या कासवला पोहोता येत नव्हते, तसेच त्यांची प्रकृतीही खालावली होती. त्यामुळे सात तासांची शस्त्रक्रिया करून कासवाच्या पोटातून ही नाणी बाहेर काढण्यात आली आहेत. कासवाच्या पाठीवर नाणी फेकल्याने माणसाचे आयुष्य वाढते अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे, पण तलावातले कासवं मात्र अन्न समजून ही नाणी गिळतात. तेव्हा असे प्रकार न करण्याचे आव्हान देखील पशूवैद्यकांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *