कोल्हापुरात प्रा. कृष्णा किरवले यांची हत्या

ज्येष्ठ आंबेडकरवादी लेखक प्रा. कृष्णा किरवले  यांची त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हत्या  करण्यात आली. आणखी एका विचारवंताची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

प्रा. कृष्णा किरवले हे शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख आहेत. ते आंबेडकरवादी होते. याआधी गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मारेकरांचा शोध लागलेला नाही. आता पुन्हा एकदा शहरात हत्या करण्यात आल्याने तणावाची स्थिती आहे.

डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या राजेंद्रनगर परिसरातील राहत्या   घरी करण्यात आली. त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. ही हत्या कोणी आणि का केली, आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *