मध्य रेल्वेवर ३३ नव्या खिडक्या सुरु

मध्यरेल्वेच्या विशेषतः हार्बरच्या लाईनवर प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तिकीटांच्या रांगा कमी व्हाव्यात यासाठी मध्यरेल्वेच्या प्रशासनानं महत्वाची पावलं उचलली आहेत. दोन महिन्यात मिळून
वेगवेगळ्या स्टेशनवर तब्बल 33 नव्या तिकीट खिडक्या सुरू करण्यात येत आहेत. त्यापैकी फेब्रुवारीत 16 खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 14 खिडक्या चालू महिन्यात सुरू होणार आहेत.

हार्बरच्या डॉक यार्ड रोड, रे रोड, कॉटन ग्रीन, पनवेल, खांदेश्वर या स्टेशनवरून प्रवास करणाऱ्यांना या नव्या खिडक्यांचा लाभ मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *