धक्कादायक! क्षुल्लक भांडणातून शेजारच्या मुलीची हत्या

गोरेगावमध्ये काल रात्री साडे आठच्या सुमारास एका १५ वर्षींय मुलीची क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. मुलीच्या शेजाऱ्यांनीच तिला केलेल्या मारहाणीनंतर तिचा मृत्यू झाला. मेघा आगवणे असं या मुलीचं नाव आहे.

मेघा सोमवारी संध्याकाळी साडे आठच्या सुमारास घरी परत येत होती. गल्लीत शिरल्यावर मेघाला 10 ते 12 जणांनी मारहाण करायला सुरूवात केली.  हे सर्व जण मेघाला तिच्या घरापर्यंत मारत मारत घेऊन आले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनाही माराहण केली. जखमी अवस्थेत मेघाला सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.

सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता मेघा ट्युशनसाठी घराबाहेर पडली. त्यावेळी तिच्या शेजारच्या घरातली महिला घराबाहेर भांडी घासत बसली होती. त्या महिलेनं मेघाला तो रस्ता वापरण्यास मनाई केली. पण मेघानं तिचं नं ऐकता तोच रस्ता स्वीकारला. चालता चालता तिचा पाय भांडी घासरणाऱ्या महिलेच्या बादलीला लागला. त्यानंतर भांडी घासणारी महिला आणि मेघा आगवणे यांच्यात जोरदार वाद झाला. यादात महिलेनं मेघाला बादलीनं मारलं. या घटनेसंदर्भात मेघाच्या आईनं गोरेगाव पोलीस स्टेशनला तक्रार केली. पण पोलिसांनी मेघाच्या आईची तक्रार गांभीर्यानं नं घेता कारवाई करण्याचं टाळलं. आणि संध्याकाळी जे घडू नये तेच घडंल. आता पोलिसांना जाग आली असून ते प्रकरणाची चौकशी करत आहेत. पण कॅमेरावर बोलण्यास मात्र तूर्तास ते तयार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *