देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. सध्याच्या घडीला मुंबईमध्ये 820 अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या रिपोर्टनुसार मुंबईमध्ये 46 हजार कोटयाधीश आणि 28 अब्जोपती राहतात. संपत्तीमध्ये मुंबई पाठोपाठ दिल्ली दुस-या तर, बंगळुरु तिस-या स्थानावर आहे.
दिल्लीची एकूण संपत्ती 450 अब्ज डॉलर असून, 23 हजार कोटयाधीश आणि 18 अब्जोपती दिल्लीमध्ये राहतात. बंगळुरुमध्ये 7700 कोटयाधीश आणि 8 अब्जोपती राहतात. त्याखालोखाल हैदराबादचा क्रमांक लागतो. हैदराबादची एकूण संपत्ती 310 अब्ज डॉलर्सची आहे.
पुण्यामध्ये 180 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. 4500 कोटयाधीश आणि 5 अब्जोपती पुण्यामध्ये राहतात. डिसेंबर 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 2 लाख 64 हजार कोटयाधीश आणि 95 अब्जोपती आहे.
