मनमाडमध्ये खासगी बसने घेतला पेट

मनमाडमध्ये खासगी बस  आणि मोटारसायकलच्या अपघातात. दोघेजण जागीच ठार झाले. अपघातादरम्यान बसनं पेट घेतला. सुदैवानं बसमधले सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्यानं बचावले.

कुंदलगाव शिवारात हा अपघात झाला. ओम साई ट्रॅव्हल्सची स्लिपर कोच लक्झरी बस पुण्याकडे जात असताना रात्री पावणे बाराच्या सुमाराला अपघात झाला.

सबस्टेशनजवळच्या वळणावर मोटार सायकल आणि बसची धडक होऊन बसनं पेट घेतला. पण मोटारसायकलवरील दोघेजण जगीच ठार झाले. मृतांची अजुनही ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *