जास्त लोणी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका

जास्त लोणी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका

जास्त लोणी खाल्ल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढत असल्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. लोण्यामध्ये फॅटी अ‍ॅसिड्स आणि स्निग्धता जास्त असल्याने लोणी न खाणाऱ्यांपेक्षा लोणी खाणाऱ्यांमध्ये मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

दर दिवसाला १२ ग्रॅम लोणीसेवनाने भविष्यात साधारण चार वर्षांनी मधुमेह होण्याची शक्यता असते. मात्र योगर्टमधून मिळणाऱ्या स्निग्धतेमुळे मधुमेहाचा धोका कमी असतो. ३,३४९ जणांवर हे संशोधन करण्यात आले. त्यापैकी लोण्याचे सेवन जास्त करणाऱ्या २६६ जणांना मधुमेहाचा धोका जास्त असल्याचा अहवाल समोर आला. या वेळी मेडिटेरियन आहारामुळे शरीराला फायदा होत असल्याचा अभ्यास समोर आला. तसेच मांसाहारी पदार्थावर नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पदार्थामध्ये कमी असणाऱ्या गोष्टी ऑलिव्ह तेल आणि सुकामेव्यातूनही मिळतात, असेही या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *