रत्नागिरीत १०८ वर्षाच्या आजीचा उत्साह

तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह एका १०८ वर्षाच्या आजींनी दाखवला. कोकणच्या ग्रामीण भागात सकाळच्या टप्यात संथ गतीने मतदान सुरू झाले होते. यातच रत्नागिरीच्या फणसावळे गावाच्या मतदान केंद्रावर १०८ वर्षाच्या दळवी आजी पोहोचल्या.

आधारासाठी हातात वॉकर घेऊन आपला मुलगा आणि नातवाच्या बरोबरीने या आजी स्वत: चालत रत्नागिरीच्या या मतदान केंद्रावर आल्या होत्या. १०८ व्या वर्षीही आजीचा मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. गेल्या काही दिवसांपासून आजी घराच्या मंडळींना मतदानाची आठवण करून देत होत्या आणि आज मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच मतदानासाठी सज्ज झाल्या होत्या. मतदान महत्त्वाचे आहे.

प्रत्येकाने समजून मतदान केले पाहिजे, असे या आजी केंद्रावर आलेल्या मंडळींना सांगत होत्या. मतदानाकडे पाठ फिरवणा-या तरुण वगार्साठी १०८ वर्षाच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *