पतीने केली पत्नीची रिक्षातच भोसकून हत्या

वैवाहिक वादातून पतीने पत्नीची रिक्षामध्येच धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील ही घटना आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रसाद रावत असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैवाहिक वादातून रावत आणि मृत गीता दुबे यांच्यामध्ये वाद झाला.
दरम्यान, गीता शॉपिंग करुन रिक्षाने परतत असताना रावतने स्वयंपाक घरातील चाकूनं भोसकून तिची निर्घृण हत्या केली.
याप्रकरणी रावतविरोधात कलम 302 (हत्येची शिक्षा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
दरम्यान, प्रसाद आणि गीताचं चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या दाम्पत्याला दोन मुले असल्याचेही माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *