मुंबईत सरासरी ५२.१७ टक्के तर ठाण्यात ५३.११ टक्के मतदान झाल्याचे मतदार नोंदणी अधिका-यांनी सांगितले.
अनेकांच्या राजकीय भवितव्याचा निकाल देणा-या आणि राज्यातील जनतेचा कौल सांगणा-या राज्यातील १० महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसाठी झालेल्या मतदानास जेमेतम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मतदानाची सरासरी टक्केवारी
» मुंबई- ५२.१७ %
» ठाणे- ५३.११ %
» उल्हासनगर- ४६.८३ %
» नाशिक- ५२.६३ %
» पुणे- ४९.५२ %
» पिंपरी- चिंचवड- ५१.८६ %
» सोलापूर- ४४.०० %
» अमरावती- ५१.६२ %
» अकोला- ४२.३९ %
» नागपूर- ४९.९५ %
राज्यात दहा महानगरपालिकेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी ३१.०१ टक्के मतदान झाले.
मात्र मतदार यादीतील घोळ, ईव्हीएम मशीनमध्ये झालेला बिघाड यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
