उमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारूतून विषबाधा, ८ ठार

जिल्ह्यातल्या पांगरमल गावातील ग्रामस्थांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले आहे. पांगरमल इथे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारुतून विषबाधा  झाल्याने आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झालाय.

या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन केलय. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा व्हावी विषबाधा प्रकरणात मयत झालेल्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख तर अत्यवस्थ असलेल्यांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *