मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस विस्कळीत झाली आहे. मध्ये रेल्वेच्या मार्गावरील अंबरनाथ – उल्हासनगरदरम्यान खड्डा पडल्याने या मार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.
अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे तर मुंबईच्या दिशेने येणारी अप मार्गावरील धीम्या गतीने सुरु आहे. यामुळे प्रवाशांना मात्र चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कर्जत, बदलापूर येथे अनेक गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. कल्याणहून सीएसटीच्या दिशेने वाहतूक सुरु आहे. खड्डा बुजविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.
पुणे इंटरसिटी, विशाखापट्टणम एक्सप्रेस, पुणे डेक्कन, सीएसटी-बंगळुरु उद्यान एक्सप्रेस, एलटीटी-हुबळी, कोयना एक्सप्रेस या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

