भायखळ्यातलं बेळेज अशोक दुग्धालय अनेक वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत आहे. बेळेजची बासुंदी घेण्यासाठी सणासुदीला रांग लागते, उपवासाची राजगीरा पुरी भाजीही चांगलीच प्रसिद्ध आहे. बेळेजमधील बालुशाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. बेळेज हे अस्सल मराठी खाद्यपदार्थांची सेवा पुरवणारं ठिकाणं आहे.
बेळेज मुंबईतील भायखळा स्टेशनच्या पूर्वेला रस्ता ओलांडून गेल्यानंतर समोरच्या बाजूला आहे. अशोक बेळेजमध्ये खाण्यापिण्याची चंगळ आहे, ज्यांना चांगलं खाण्याची आवड आहे, त्यांच्यासाठी हे मराठी रेस्टॉरंट आहे. या व्यवसायात तिसरी पिढी काम पाहतेय. बेळेजमध्ये मिठाईपासून फरसाण, ते अगदी नाश्तापर्यंत सर्व काही उपलब्ध होते.
