ही धक्कादायक बातमी आहे देशातील वायू प्रदूषणासंदर्भात. प्रदुषणाच्या विळख्यात भारतीय घुसमटत जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
वायू प्रदूषणामुळे तर नागरिकांना श्वास घेणंही कठीण बनलंय. दर मिनिटाला सरासरी दोन भारतीयांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती वैद्यकीय क्षेत्रातील अहवालातून समोर आलीय.
एक दशलक्षापेक्षा अधिक भारतीय नागरिक दूषित हवेमुळे मृत्युमुखी पडत आहेत. तसेच, अनेक भारतीय शहरं प्रदूषित झाल्यानं ती जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत अग्रक्रमावर आहेत असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय.
वायु प्रदूषणाचे प्रमाण 2.5 पीएम इतके आहे. या बाबींचा सर्वाधिक धोका मानवी हृदयाला होतो तसंच, यामुळे जगात 18 हजार व्यक्ती दररोज मृत्युमुखी पडत असतात. तर हवा प्रदूषित करण्यात कोळशावर आधारित उद्योगांचा ५० टक्के वाटा असतो.
