अंधेरी स्टेशनवर या क्रिकेटरनं घुसवली कार

अंधेरी रेल्वे स्टेशनमध्ये एका तरुणानं कार घुसवल्याची घटना समोर आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोमवारी सकाळी 7.30 वाजताची ही घटना आहे. हरप्रीत सिंग नावाच्या तरुणाने भरधाव कार चालवत अंधेरी रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर घुसवली.
दरम्यान, हरप्रीत सिंग हा अंडर 19 इंडियन क्रिकेट टीममधील खेळाडू असल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वे स्टेशनवर कार घुसवल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सध्या  घटनेची चौकशी सुरू आहे.
अंधेरी रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. त्यात गर्दीच्या वेळी रेल्वे स्टेशनवर अचानक कार घुसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र वेळीच हरप्रीत सिंगनं कारवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *