मुसलमान बेरोजगार असेल तर मुलंच जन्माला घालणार – आझम खान

मुसलमानांकडे करण्यासाठी काहीच काम नसल्यामुळे ते जास्त मुलं जन्माला घालतात असं वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलं आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इलाहाबादमध्ये आयोजित प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आझम खान नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यात आता हे नवं वक्तव्य केल्याने अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आझम खान यांनी मुसलमानांच्या हाताला काहीच काम मिळत नसल्याचं रडगाणं मांडताना बोलले की, ‘ बादशहाने (नरेंद्र मोदी) जर काम दिलं असतं तर मुसलमानाने कमी मुलं जन्माला घातली असती. आमच्या येथे मुसलमानांची लोकसंख्या जास्त असते आणि काम कमी, त्यामुळेच जास्त मुलं जन्माला येतात. मुसलमान मोकळा बसला असेल तर मुलंच जन्माला घालणार. हिंदू जास्त मुलं जन्माला घालत नाहीत कारण त्यांच्याकडे रोजगार असतो’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *