रमजानच्या पवित्र महिन्यात भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा माणुसकीचं उदाहरण पाहायला मिळालं. भारत-पाकिस्तानची सीमा ओलांडून भारतीय सिमेत दाखल झालेल्या एका महिलेला भारतीय लष्करांनी परत पाकिस्तानकडे पाठवलं आहे.
शबनम नावाची ही महिला जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये दाखल झाली होती. या महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याचं भारतीय लष्करांच्या लक्षात आलं. त्यानंतर तिची विचारपूस करुन तिला परत पाकिस्तानी जवानांच्या ताब्यात दिलं आहे.
या महिलेला पाकिस्तानी जवानांच्या ताब्यात देण्याआधी भारतीय लष्कराच्या एका महिला अधिकारीनं, तिला नवीन कपडे आणि भेट वस्तूही दिल्या.

