मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर  मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी. मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान आज आणि उद्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते सायंकाळी 4.20 पर्यंत दुरुस्तीची काम केली जाणार आहेत. त्यामुळे मेगाब्लॉकच्या या कालावधीत सर्व लोकल या सकाळी 11 ते संध्याकाळी  5 वाजेपर्यंत 10 मिनिटं उशिराने धावणार आहेत.

तर हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहीम स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 पर्यंत दुरुस्तीची काम केली जाणार आहेत.

त्यामुळे सीएसटी ते पनवेल दरम्यान सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 पर्यंत आणि पनवेल ते सीएसटी दरम्यान सकाळी 9 वाजून 52 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 26 मिनिटांपर्यंत बंद राहणार आहे. तर दरम्यानच्या काळात कुर्ला-पनवेल हि विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *