करचुकवेगिरी प्रकरणी सानिया मिर्झा इन्कम टॅक्सच्या कोर्टात

सेवा कर न भरल्या प्रकरणी भारताची महिला दुहेरीमधील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाला सेवा कर विभागाने नोटीस बजावली आहे. हैदराबादमधील सेवा कर विभागाच्या प्रधान आयुक्तांनी 6 फेब्रुवारीला या प्रकरणी सानियाला समन्स बजावले. तिला 16 फेब्रुवारीला हजर होण्यास सांगितले आहे.
केंद्रीय अबकारी कायद्यातंर्गत सानियाला हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. आपण करचुकवेगिरी केली नाही हे सिद्ध करण्यासाठी सानियाला काही कागदपत्रे ही सादर करावी लागू शकतात.
जर तुम्ही समन्सला प्रतिसाद दिला नाहीत. जाणीवपूर्वक गैरहजर राहिलात, पुरावे दिले नाहीत तर आयपीसीच्या तरतुदीअंतर्गत तुम्ही शिक्षेला पात्र आहात असे सानियाला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *