काही महिन्यांपूर्वी रसिकांच्या भेटीला आलेली छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘नागार्जुन एक योध्दा’मधील अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर श्रुतीचा कोबरा सापाबरोबरचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. काल रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्रुती उल्फतसह चार जणांना अटक केले आहे. वन्य जीव अधिनियमाचे उलंघन केल्याच्या आरोपाखाली या चार जणांना अटक कऱण्यात आली आहे.
श्रुती उल्फतसह मालिकेतील आणखी एका अभिनेत्रीला आणि प्रोडक्शनमधील दोन व्यवस्थापकास अटक करण्यात आले आहे. डीएनएच्या वृत्तानुसार काही पशु कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई प्रादेशिक विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक केली आहे. तसेच त्या चार जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला होता. श्रुती उल्फतने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यामुळे तो अधिकच व्हयरल झाला. व्यवस्थापन टीमच्या मते कोबऱा सापाच्या चित्रणाचा व्हिडिओ स्पेशल इफेक्टसचा वापर करुन केला तयार केला आहे. त्यामध्ये कोणताही जिंवत अथवा मृत साप नाही.
दरम्यान, वन विभागाने सोशल मीडियावरील तो व्हिडिओ डाऊनलोड करुन कलिना येथिल फॉरेंसिक लॅबला परिक्षणासाठी पाठवला होता. 17 जानेवारी रोजी त्याचा रिपोर्ट मिळाला त्यामध्ये व्हिडिओ मध्ये जिंवत साप वापरण्यात आल्याचे दिसून आले. काल चारही जणांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
