मुंबई – गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झालाय. या अपघातात गाडीतून प्रवास करणारे सात जण जागीच ठार झालेत.
गोवा महामार्गावर खानू गावाजवळ हा अपघात झालाय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्ता सोडून बाजुच्या झाडावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भयंकर होता की अपघातग्रस्त झायलो गाडीतून प्रवास करणारे चार जण जागीच ठार झाले तर सुदैवानं बचावलेला एक जण गंभीर जखमी अवस्थेत आहे.
अपघातातील सर्व जण मुंबईतल्या मुलुंडचे राहिवाशी असल्याचं समजतंय.
