२ मिनिटात चंद्रावर पोहोचवेल ही सोलार एक्सप्रेस

जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही २ मिनिटात चंद्रावर पोहोचू शकतो तर ? तुम्हाला विश्वास बसणार नाही ना ? पण मनाच्या गतीपेक्षा वेगाने धावणारी एक्सप्रेसवर कॅनडाची एक इनोवेटिव फर्म चार्ल्स बॉम्बार्डियर काम करत आहे. कंपनीने भविष्यात एक अशी सोलार एक्सप्रेसची कल्पना केली आहे जी धरतीवरुन अंतराळात फेरी मारेल. पृथ्वीवरुन मंगळावर पोहोचण्यासाठी याला फक्त २ दिवस लागणार आहे. ऐवढंच नाही तर कश्मीरवरुन कन्याकुमारीला जाण्यासाठी ही ट्रेन फक्त १.२० सेकंड घेईल.

ही ट्रेन डब्यांपासून नाही तर सिलेंडरची एक सीरीज असेल. प्रत्येक सिलेंडरची लांबी कमीत कमी ५० मीटर असणार आहे. एक ट्रेनमध्ये असे ६ सिलेंडर असतील. याची संपूर्ण लांबी ३०० मीटर असेल. प्रत्येक सिलेंडर चार भागात वाटलेला असेल. ही विशेष सोलार एक्‍सप्रेस गुरुत्वाकर्षणचा वापर करणार आहे. याच्या मदतीने ती धरती आणि अंतराळात फेरी मारेल. या इंजिनचं डिजाइन इंडस्ट्रीयल इंजीनियर ओलिविएर पेरैल्डी नावाच्या कंपनीने विकसित केलं आहे. या ट्रेनमध्ये तारही बाजुला एक सोलार पट्टी असेल ज्याच्या ऊर्जेवर ही ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन सुरु झाल्यानंतर तिची गती शेवटच्या स्थानाच्या आधी कमी होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *