पाकिस्तानमध्ये ईदगाह बाजारात बॉम्बस्फोट, १५ जण ठार

पाकिस्तानमध्ये ईदगाह बाजारात बॉम्बस्फोट, १५ जण ठार

पाकिस्तानमधील कुर्रम एजन्सीच्या बाजारात शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला असून या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी आहेत. हा अपघात शनिवारी सकाळच्या सुमारास कुर्रम एजन्सीच्या ईदगाह बाजारात झाला. कुर्रम एजन्सीचे हे प्रशासकीय मुख्यालय अफगाणिस्तानच्या सीमेपासून नजीकच्या अंतरावर आहे.

हा अपघात ईदगाह बाजारामध्ये असलेल्या भाजीच्या मार्केटमध्ये झाला. स्फोटके ही भाज्यांच्या क्रेटमध्ये ठेवण्यात आली होती. भाज्यांचा लिलाव सुरू असताना हा स्फोट झाला. यावेळी बाजारात मोठी गर्दी असल्यामुळे २० जणांचा मृत्यू झाला तर अन्य ३० जण गंभीर जखमी आहेत.

या स्फोटानंतर सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहीम हाती घेतली. ईदगाह परिसर खाली करण्यात आला. या स्फोटमध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अफगाणिस्तानच्या तीन प्रांताच्या सीमेला लागून असल्यामुळे कुर्रम हा परिसर अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या भागातून दहशतवादी प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये घुसखोरी करतात. दरम्यान, या बॉम्बस्फोटची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनांनी घेतली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *