सुलभ शौचालयाचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मानखुर्द येथील इंदिरा नगर झोपडपट्टी परिसरातील ही घटना आहे.
हरिश पटेदार (वय 40 वर्षे) आणि गणेश सोनी (वय 45 वर्षे) अशी दोन मृतांची नावे आहेत. तिस-या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
डीसीपी अशोक दुधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
