नागपुरात अजूनही उमेदवारांच्या नावांची घोषणा नाही

महानगरपालिका निवडणुकीकरता नामांकन अर्ज दाखल करण्याकरता केवळ 36 तास शिल्लक उरलेत. पण राष्ट्रवादी वगळता नागपुरात प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही निवडक उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तरीही काँग्रेस, भाजप, शिवसेनेची यादी अद्याप गुलदसत्यातच आहे.

विदर्भात नागपुर, अकोला आणि अमरावती येथे निवडणुका होणार असून बहुतेक राजकीय पक्ष आज यादीची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *