चिंचवड येथे रेल्वे रूळ ओलांडताना एकाचा मृत्यू, आत्महत्येचा संशय

चिंचवड (पुणे) रेल्वे स्थानकाजवळील दळवी नगर झोपडपट्टीच्या बाजूला असलेल्या पुलाखाली रेल्वे रूळ ओलांडताना एका इसमाचा रेल्वेने धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. सचिन बाबुराव जाधव (वय 33, रा रुपीनगर) अस रेल्वे अपघातात मृत व्यक्तीचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा-पुणे ही रात्री ८.३० ची लोकल जात असताना सचिन जाधव हे दळवी नगर येथील पुलाखालून रेल्वे रूळ ओलांडत होते. त्याचवेळेस लोणावळा- पुणे या लोकलने सचिन जाधव याना जोरदार धडक दिली. यामध्ये जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. रेल्वेची एवढी जोरात धडक होती की जाधव यांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. विशेष म्हणजे जाधव हे मी चिंचवडला जाऊन येतो अस म्हटले होते. त्यामुळे ही घटना आत्महत्या तर नाही ना, असा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस नाईक लोंढे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *