एका भारतीय तरुणाला लेडीज वॉशरुममध्ये डोकावून पाहिल्याच्या आरोपाखाली तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका साऊदी महिलेच्या तक्रारीनंतर 26 वर्षीय तरुणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. हा भारतीय तरुण त्या वॉशरुममध्ये स्वच्छता करण्याचं काम करत असे.
‘द खलीज टाईम्स’च्या वृत्तानुसार, ही तक्रार एका 47 वर्षीय महिलेने केली असून लेडीज वॉशरुमच्या क्यूबिकल भींतीच्या मागून डोकावून पाहत असल्याचा आरोप केला आहे. महिलने आरडाओरड केल्यानंतर तो तरुण तिथून पळून गेला.
वृत्तामधील माहितीनुसार, हा तरुण छेडछाडीच्या आरोपाखाली दोषी ठरला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केले आहे आणि आता या तरुणाला तीन महिने तरुंगात ठेवले जाणार आहे.

